संगणकाचे प्रकार
1 मेन फ्रेम कॉम्प्युटर - मेनफ्रेम कॉम्प्युटर आकाराने खूपच मोठे असतात. एखाद्या
मोठ्या खोलीत मावतील एवढे. हे संगणक
अतिशय वेगाने माहितीवर प्रक्रिया घडवून आणतात.
एका सेकंदात किती सूचनांवर प्रक्रिया घडवून आणल्या जातात त्यावर यांची गतिमानता /
क्षमता ठरवली जाते. महाग असूनही हे संगणक वापरले जातात कारण याची माहिती साठवून
ठेवण्याची क्षमता जास्त आहे. टेल्कोसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच विद्यापीठ, रेल्वे आरक्षण इ. ठिकाणी मेनफ्रेम कॉम्प्युटर वापरला जातो.
सर्व माहिती एका मुख्य संगणकामध्ये साठविली जाते व ह्या माहितीतून आवश्यक तेवढीच
माहिती वेगळी करून वापरता येते. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी एकाच प्रकारच्या
माहितीवर वेगवेगळी कामे करू शकतात
.

·
मिनी कॉम्प्युटर - १९६० नंतर या
प्रकारचे संगणक विकसित झाले. त्या काळातील इतर संगणकापेक्षा हे संगणक आकाराने लहान
होते व त्याची गती व क्षमताही कमी होती. म्हणून त्यांना मिनी कॉम्प्युटर हे नाव
दिले गेले. यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकत. सध्या या प्रकारचे
संगणक फारसे अस्तित्वात नाहीत.

·
लॅपटॉप व पामटॉप हेही मायक्रो
कॉम्प्युटरचेच प्रकार होत.
1.
लॅपटॉप म्हणजे एका
छोट्या ब्रिफकेसमध्ये मावणारा पर्सनल कॉम्प्युटर ब्रिफकेसप्रमाणेच हा कुठेही नेता
येतो किंवा मांडीवर ठेवून काम करता येते. ऑफीसपासून दूर किंवा बाहेरगावी काम
करण्यासाठी लॅपटॉप वापरला जातो. उदा. आय बी एम थिंक पैड.
2.
पामटॉप संगणकाचे उदाहरण
म्हणजे डिजिटल डायरी व कॅलक्युलेटर प्रमाणेच हातात मावणारे हे छोटे संगणक. फोन
नंबर्स किवा पतं साठवून ठेवण्यासाठी या प्रकारची डायरी वापरली जाते.
Very helpful information
ReplyDeletePost a Comment
thanks for ....