संगणक रचना


संगणक रचना
संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतो.संगणकांना पुरवलेली  माहिती आकडे, चित्रे, आवाज, ध्वनी अशी बहुरूपी असू शकते, पण संगणकसंचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार "आकडेमोडी" करणे हे सामान्य लोकांना अगदी अजब भासणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे.

चर्च-टयूरिंग युतीच्या सिद्धांतानुसार वेळेचे बंधन नसेल तर कमीतकमी क्षमतेचा संगणकसुद्धा कोणत्याही उच्च क्षमतेच्या संगणकाइतकेच काम करू शकतो. त्यामुळे सगळ्या तर्हांच्या संगणकांची रचना मूलतः सारखीच असते. पूर्वी अगदी माफक क्षमतेचे संगणक एक मोठी खोली व्यापत असत. आता फक्त अतिकुतट आकडेमोडी करू शकणारे अतिप्रभावी संगणक (महसंगणक) तसे मोठे असतात. त्यांना इंग्रजीत "मेनफ्रेम" अशी संज्ञा आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणार्या लहान संगणकांना "पर्सनल कंम्प्यूटर" अशी इंग्रजी संज्ञा आहे, तर कुठेही सहज नेता येणार्या छोट्या संगणकंना "नोटबुक कम्प्यूटर" अशी संज्ञा आहे. आज सर्वांत अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे "एम्बेडेड कंम्प्यूटर". लष्करी विमानांपासून डिजिटल कॅमेरापर्यंत अनंत गोष्टो नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात.
संगणकात सर्वप्रथम माहिती किंवा डेटा भरावा लागतो. या माहितीवर प्रक्रिया होऊन ही सव्यवस्थित माहिती तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळवता येते. माहिती भरण्याच्या क्रियेला इनपुट असे म्हणतात. त्यावर प्रक्रिया होऊन आवश्यक आउटपुट मिळवलं जातं. म्हणजेच,
कच्ची इनपुट -> प्रोसेस -> आउटपुट;
माहिती भरण्यासाठी जी साधने वापरली जातात त्याना इनपुट डिव्हाइसेस अस म्हणतात. कोणत्याही यंत्रणेचे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्या भागाद्वारे माहितीआत घेतली जाते ते भाग होय. उदा. आपण आपल्या पाच इद्रियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. म्हणजेच नाक, कान, डोळे व जीभ इ. आपले इनपुट डिव्हाइसेस आहेत, माहितीवर प्रक्रिया करणा-या भागाला सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट अस म्हणतात. थोडक्यात सीपीयु हा संगणकाचा मेंदू होय. तर अंतिम उत्तरे किंवा माहिती ज्या साधनांद्वारे मिळवली जाते त्यांना आऊटपुट डिव्हाइसेस असे म्हणतात, अशा प्रकारे संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रितरित्या काम सुरू असते व ते अतिशय वेगाने होऊन आपणास आपल्याला हवी ती उत्तरे मिळवता येतात. संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया होऊन आवश्यकतेनुसार ती साठवून ठेवली जाते. मात्र टाईप करताना आपण जरी डेटा आपल्या नेहमीच्या भाषेत (मराठी, गजी किंवा इतर कोणतीही भाषा) लिहीत असलो तरी ही भाषा संगणकाला कळत नसते. संगणकाला कळतात त्या फक्त दोन स्थिती - ० व १। किवा ० ०) या दोन स्थितींच्या सहाय्याने प्रत्येक अक्षरास किंवा अंकास किंवा चिन्हास एक सांकेतिक कोड़ बहाल केली जाते. प्रत्येक अक्षर / अंक 03 च्या संचाने बनलेला असतो.
म्हणजे या संकेतानुसार अक्षरे खालीलप्रमाणे लिहीली जातात
अक्षर
कोड
A
००००१०१०
P
०१११००००
०१०११००१
अशा प्रकारे ० व १ च्या संचाने एक अक्षर / अंक बनते. यास बायनरी सिस्टिम (Binary System) असे म्हणतात. प्रत्येक 0 1 ला बिट (Bit) असे म्हणतात. आठ बिटसच्या संचास एक बाईट (Bite) असे म्हणतात.
म्हणजेच
अक्षर / अंक = ८ बिटस् =१ बाईट.
बायनरी सिस्टिममधील इतर एकके खालीलप्रमाणे आहेत -
१०२४ बाईट = १ किलो बाईट (KB)
१०२४ किलो बाईट = १ मेगा बाईट (MB)
१०२४ मेगा बाईट = १ गिगा बाईट (GB)
१०२४ गिगा बाईट = १ टेरा बाईट (TB)
अशाप्रकारे ० व 1 च्या सहाय्याने संगणकात सर्व माहिती साठविली जाते. संगणकावर काम करताना मात्र ही भाषा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. टाईप करताना आपण आपल्याच भाषेत टाईप करतो व मॉनिटर किंवा प्रिंटरवरील आऊटपुट हाही आपल्याच भाषेत असतो. संगणकाच्या आत मात्र बायनरी सिस्टिम वापरली जाते


1 Comments

thanks for ....

Post a Comment

thanks for ....

Post a Comment